सुरगाणा न्यूज :- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे भात या शेत पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान हे झालेले आहे. भात या पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी हे हवालदील झालेली आहेत.
सुरगाणा तालुका हा आदिवासी जिल्हा आहे. संपूर्ण सुरगाणा तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप असते त्यामुळे या भागातील शेतकरी भात या पिकाची शेती करत असतात. मात्र यावेळी भात शेती सुद्धा टिकून राहिलेली नाही. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहे.
गणेश नगर (धुरापाडा ) खोबळा या भागात खूप प्रमाणात नुकसान….
सुरगाणा तालुक्यातील धुरापाडा, खोबळा या भागामध्ये खूप प्रमाणात शेतकरी यांचे नुकसान झाले आहे. काही शेतकरी यांनी आपल्या भाताची कापणी ही केलेली असताना पावसाने हजेरी लावल्यामुळे भात या पिकाचे संपूर्ण नुकसान हे झालेले आहे.
रोजच्या पावसामुळे शेतकरी यांच्या पिकांचे खूप नुकसान हे होत आहे मात्र याकडे सरकारने अजून पर्यंत लक्ष हे दिलेली नाही त्यामुळे शेतकरी हे नाराज आहेत.
ज्या शेतकऱ्यांची भात शेती ही पूर्णपणे पिकाची बाकी होती त्यांची पिके ही जमिनीवर पडलेली आहेत. त्यामुळे भात या पिकाचे पिके व्यवस्थित येणार नाही अशी माहिती ही शेतकरी यांनी दिली.
धुरापाडा या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीची कापणी करून शेतामध्ये वाळवणी करण्याकरिता ठेवले असते पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे नुकसान हे झालेले आहे.
या प्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकरी यांच्या म्हणण्यानुसार भात या पिकामध्ये पिके परिपक्व होत नाही त्यामुळे शेतकरी यांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका हा दिसून येत आहे.
वरील प्रमाणे शेतकरी यांचे नुकसान हे झालेले आहे यामुळे भातकुजण्याचे व व जे भात परिपक्व आहे ते उगवून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी यांचे दोन्ही बाजूंनी नुकसान हे होत आहे.
पीक नुकसान झाल्याची अशी नोंदवा तक्रार
जर तुमच्या पिकाची नुकसान हि झालेली असेल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार हे मदत करते त्याबाबत सुरगाणा तालुक्यातील तहसील कार्यालय मधून परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेले आहे.
यामध्ये आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
तर सर्व नुकसानग्रस्त शेतकरी यांनी आपले पंचनामे हे तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून करून घेणे. असे आवाहन हे तहसील कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे.
मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स या देण्यात येतात