“३० वर्षापूर्वी ग्रामीण भागात दळणवळण व्यवस्था एक कडवे आवाहन….
कॉ जे पी गावीत यांच्या वन विभाग विरोधी आक्रमक भूमिकेमुळे खेडोपाडी रस्त्यांचे जाळे विणले गेले….”
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वांगीण परिस्थिती देशासमोर मोठें आवाहन होतें, अशातच 1965 चे युद्ध, 1972 चा जीवघेणा दुष्काळ, निसर्गाचा प्रकोप, या व आशा अनेक संकटांनी देश कठीण काळात एकेक पाऊल पुढे टाकत होता
ग्रामीण भाग त्या मानाने दुर्लक्षित होताच, अशातच हरिभाऊ महाले ए टी पवार जे पी गावीत, हरिश्चंद्र चव्हाण , अशा तरुणांनी समाजकार्याची कास धरली, विवीध पक्षांच्या विचारधारा अंगिकारून राजकरणात सक्रिय झाले, आमदार खासदार मंत्री अशा पदांवर जाऊन समाजात राजकरण करण्याचा प्रयत्न केला. पण यातील काही लोकं आपल्या कार्याने छाप सोडत राहिले, समाजात नावघेने कार्य करत राहिले, काही मात्र आपापल्या अपयेशाने म्हणा किंवा अकार्यक्षमतेने म्हणा, किंवा जनतेने नाकारले म्हणून म्हणा… पण ते इतिहास जमा होत गेले आणि कागदावरच राहिले, ते जनतेच्या नजरेतून दूरही झाले……
1978 ते 2024 या काळात जनतेच्या नजरेसमोर टिकून राहिले ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराने प्रभावित झालेले पक्ष विचार आणि जनतेशी एकनिष्ठ राहिलेले कर्मयोगी कॉ जे पी गावीत…….,राजकारण्यांच्या , राजकीय पक्षांच्या आणि विरोधकांच्या अवतीभवती चर्चेत राहिले, चर्चेत आजही कायम आहेत…. याला एकच कारण आहे……त्यांनी सत्ता, पद यापेक्षा जनतेशी नाळ जोडली तर जनता आपले नाव, साथ आणि कार्य विसरत नाही.. हे विचार एकाच राजकारणी पुढाऱ्याकडे होते आणि आहेत ते ….. कॉ जे पी गावीत….
1978. 80 चा काळ तसा फारच कठीण… येथील आदिवासी समाज अशिक्षित, गरीब, अज्ञानी, अंधश्रध्देच्या आहारी गेलेला आणि काही प्रमाणात भित्रा…. त्यामुळें वैचारिक बदल घडविणे तारेवरची कसरत होती.. मात्र त्या काळात कॉ रामजी धुळे, कॉ के के पवार कॉ जे पी गावीत , चिंतामण गावित, हिराजी चौधरी, काशीराम गायकवाड, रामजी गावीत या व इतर कार्यकर्त्यांनी येथील आदिवासींची दुःखे अश्रू ओळखून आपल्या समाजासाठी सामजिक कार्यास सुरुवात केली.
येथील ग्रामीण भागात अधिकारी पदाधिकारी यांची दादागिरी होती, फॉरेस्ट ऑफिसर तर एक इंच जागा द्यायलाही विरोध करत होतें, हल्ले करत होतें, माता भगिनीवर अत्याचारही करत होतें. खेड्यातील माणूस खेड्यातच आपले आयुष्य खर्ची घालून जगत होता. अज्ञान आणि गरिबीने भेदरलेल्या आदिवासी माणूस , तालुका, जिल्हा, शहराला जोडण्याशिवय पर्याय नव्हता.
यासाठी दळणवळण व्यवस्था काळाची गरज बनली होती…
अशातच डोंगर दऱ्यात वास्तव्यास असलेला आदिवासी फॉरेस्ट बहुल भागात वास्तव्यास असल्याने त्याला पाडे, वस्ती, गाव, येथून रस्त्यांच्या सहाय्याने सुशिक्षित शहराशी तेथील समाजाशी जोडने गरजेचे होते.
सर्वात मोठी अडचण होती ती वनविभाग….. वनविभागाची परवानगी, वनविभागावर अतिक्रमण म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणे…..
हे आताच्या मॉडर्न युगातील युवकांनी समजून घेणे गरजेचे आहे, एक विजेचा खांब गाडायला, एखाद्या विहिरीसाठी लागणाऱ्या जागेला, आणि ताजे उदाहरण हक्काच्या आदिवासी फॉरेस्ट प्लॉट ला शासनाचा किती प्रखर विरोध होतोय…
हे समजून घेतले तर आजच्या युवकांना समजेल की फॉरेस्ट विभागाचा प्रतिकार असतांना येथील गावागावांतील रस्ते कसे काढले असतील. आपल्या वडीलधाऱ्यानी कसा संघर्ष केला असेल… फॉरेस्ट वाल्याच्या किती त्रास सहन करावा लागला असेल…
कॉ जे पी गावीत आणि त्यांचे सहकारी यांनी आक्रमक भुमिका घेतली, फॉरेस्ट ऑफिसर यांची दादागिरी धुडकावून लावली, संघर्ष केला, आक्रमण केले, विशेष म्हणजे स्वतः कॉ जे पी गावीत आपल्या सहकाऱ्यांसह रात्री, पहाटे, रात्रभर डोंगरदऱ्यात उभे राहुन फॉरेस्टच्या जागेतून जनतेच्या सहकार्यातून रातोरात रस्ते काढले आहेत. हे जरा तीस वर्षापूर्वीच्या नागरीकांना विचारले तर नक्कीच या कार्याची माहिती अधिक सविस्तर सांगतील. आणि अधिक सत्यता पटवून देतील.
फॉरेस्ट बहुल भाग असल्याने रस्ते हे मोठें आवाहन असतांना आमदारकीचा वापर करुन फॉरेस्ट ऑफिसर यांना जनतेची एकजूट दाखवत गावोगावी दळणवळण व्यवस्थेसाठी रस्ते काढण्यास आजवर जे पी गावीत यांनी माघे पुढे कधीच पाहिले नाही.
आपल्या युवकांनी आणि विरोधकांनी गेल्या 40 वर्षातील गावोगावी खेडो पाडी वस्तीवरील कच्चे आणि पक्के रस्ते कधी झाले ते तपासले तर सत्य समोर येईल. जे पी गावीत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला मानणाऱ्या नागरीकांनी रस्ते काढण्यासाठी, तालुका जिल्हा शहराला जोडण्यासाठी काय हाल अपेष्टा सहन केल्या आहेत हे आजच्या युवकांनी जरा राजकरण बाजूला ठेवून लक्षात घेणे गरजेचे आहे.
सर्व जे पी गावीत यांनी केले नाहीं असे तुमचे मत असेल तर…..
(मी खासदार आमदार मंत्री कोण कोण होऊन गेले ती नावे सांगत नाहीं)
पण……
लोकसभा मतदार संघ निर्माण झाला तेव्हापासून तर आज पर्यंतच्या खासदारांनी फॉरेस्ट मधून किंवा इतर जागेतून नवीन रस्ता काढला असेल… तर
त्या खासदारांच्या कामाचाहि हिशोब तपासला पाहिजे…. दळण वळण व्यवस्थेतील त्यांचें योगदान तपासले पाहिजे….
महाराष्ट्र राज्याची विधानसभा अस्तित्वात आल्यापासून या मतदार संघात जे पी गावीत यांची कारकीर्द वगळता ….
किती आमदार झाले,… कोण कोण आमदार झाले…. कोण मंत्री झाले…
यांचा कार्यकाळ किती, यांनी काय केलें, दळणवळण व्यवस्थेतील यांचे योगदान काय, फॉरेस्ट विभागाशी संघर्ष करुण एखादा रस्ता काढला का, एखादे गावं रस्त्याने जोडले का…. एखादी गरीब वस्ती जोडली का,…. हेही युवकांनी तपासणे गरजेचे आहे….
अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्हीं बाजूला किंवा आलटून पालटून नारळ फोडणे, उद्घाटन करणे, लोकार्पण करणे, डांबर टाकणे, मुरूम टाकणे सोपे आहे हो……
पण गरज असेल तेथे रस्ता काढतांना शासन प्रशासन याला न जुमानता लोकांची गरज लक्षात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी शासनाशी दोन हात करण्याची ताकद लोकप्रतिनीधीं मध्ये असेल तर असंभव ते संभव होऊ शकते हे कॉ जे पी गावीतच सिद्ध करू शकतात….. सिध्द करुन दाखवले आहे….
युवकांनी कॉ जे पी गावीत यांच्या कार्यावर बोट ठेवणे योग्य की अयोग्य आहे हे बोलण्यापेक्षा 1978 ते 2024 या काळातील आमदार खासदार मंत्री यांच्या कार्याचा पक्षभेद विरहित आढावा घेतला आणि सद्सद्विवेक बुद्धीने मागोवा घेतला तर ज्या पुढाऱ्यांने काम केले आहे त्या प्रत्येकाच्या कार्याचा इतिहास, योगदान आणि नजरेत भरेल असे कार्य दिसल्याशिवय राहणार नाही….
मित्रांनो……
कडू वाटेल…. पण सत्य आहे.. गोर गरीब आदिवासी, बिगर आदिवासी, शेतकरी, बागायत शेतकरी, कामगार शेतमजुर, व्यापारी, व्यावसायिक, युवक युवती, विध्यार्थी , माता भगिनी, बांधव यांच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारा असा…..लोकप्रतिनिधी होणे नाहीं….. करतोय*
जे पी गावीत यांचा संघर्ष फॉरेस्ट प्लॉट बाबद् …..
१९७२ते ७६ या कालावधीत समाजकार्य करतांना आपल्या बीएससी शिक्षणाचा वापर समाजकार्यासाठी व्हावा या हेतूने समाजकार्य केलें, पुढे माकप च्या विचाराने व कार्यकर्त्यांच्या सहवासाने आदिवासी शेतकरी कामगार शेतमजुर यांच्यासाठी कार्य सुरु केले, १९७८ ला आमदार झाल्यानंतर कॉ जे पी गावीत यांचे १९७८ पासून फॉरेस्ट प्लॉट लढा देण्याचे कार्य आजपर्यंत अविरतपणे चालू आहे
आदिवासी हा जमिनीचा मूळ मालक आहे…. हे सांगताना ते म्हणतात की येथील भूमिहीन आदिवासीं आपल्या कुटुंबासाठी, उज्वल भविष्यासाठी हक्काची जमीन शोधत आहे. त्यात काही अल्पभूधारक आहेत अशा आदिवासींसाठी त्यांनी पुढाकार घेतला , त्यांना हक्कांची जमीन मिळावी म्हणून आधार दिला….येथील प्रत्येक आदिवासीं बांधवांचा फॉरेस्ट प्लॉट वर पूर्णपणे अधीकार आहे.
कसेल त्याची जमीन या विचाराने फॉरेस्ट प्लॉट ताब्यात घ्या अशी हिम्मत दीली. आदिवासींनी सुरुवातीला १५ ते २० एकर पर्यंतचे फॉरेस्ट प्लॉट ताब्यात घेतले, शासनाच्या नियमानुसार १० एकर फॉरेस्ट प्लॉट ताब्यात आहेः तो मिळाला पाहिजे त्यासाठी संघर्ष करा , कसत रहा … लढत राहा आपण तो आपल्या ताब्यात घेणारच हि हिंममत दिली. येथील गोर गरीब अशिक्षित भितरा आदिवासी पाहून, येथील फॉरेस्ट ऑफिसरची मनमानी दादागिरी सुरु झाली गावितांनी आक्रमकपणे ती संपवली , आदिवासीं बांधवांना बहिणींनी त्रास देणारे अधिकारी आणि त्यांची दादागिरी कायमची बंद केली .
हक्कांची जमीन सोडणार नाही , सोडायची नाही आशा विचाराने गावीतांनी संघटन मजबुत केले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसानसभा संघटना मजबुत करुण शासनाशी संघर्ष केला मोर्चे आंदोलने घेराव संप यातून मोठा संघर्ष उभा केला. आमदारकीचा वापर करुन शासनाला वारंवार या विषयावर तोडगा काढायला प्रवृत्त केले. *अखेर २००६ साली माकप च्या ६४ खासदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आणि वन कायदा लागू करण्यास भाग पाडले.खुर्चीसाठी सत्तेसाठी या सरकारने फॉरेस्ट ॲक्ट २००६ लागू केला. तयानंतर २००८ ला तो अमलात आला मात्र २००८ ते २०२४ पर्यंत अनेक सरकारे आली. पण महाराष्ट्र शासन केंद्राने लागू केलेला वन हक्क कायदा अंमलात आणत नाही.दरम्यान जे पी गावीत यांनी पायी लाँग मार्च, ठिय्या आंदोलन, जेलभरो, महामुक्काम अशी आंदोलने करुण ताब्यातील हक्काची जमीन आदिवासींच्या नावे करा असा अट्टाहास धरला मात्र शासन ही मागणी मान्य करण्यास आतपर्यंत दिरंगाई करत आले.
सबंध महराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कॉ जे पी गावीत सातत्याने या प्रश्नाला प्राधान्य देत न्यायासाठी लढत आहेत. महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षात अनेक आदिवासी आमदार महाराष्ट्र शासनात कार्यरत होते, निवडूण जात होतें, काही तर आदिवासी विकास विभागाचे मंत्री होत होतें, पण आदिवासींना त्यांच्या हक्कांची जमीन द्यायला कोणीही पुढे येत नव्हते आणि आजवर कोणी आलेही नाही. इतिहासात आवाज उठवल्याची कुठे नोंदही नाही.
त्यामुळें फॉरेस्ट प्लॉट धारकांना जमीन हक्कापासून दूरच ठेवले.
आदिवासींना ताब्यातील फॉरेस्ट प्लॉट मिळावा यासाठी विधिमंडळाच्या सभागृहात आजपर्यंत कोणीही तोंड उघडले नाही.
गेली ४० वर्ष जे पी गावीत साहेब एकटा लढतोय…. हो पंचेचाळीस वर्ष सतत लढतोय… यात चुकीचे काहीच नाही…..
जे पी गावीत यांच्या कामाची पावती मागणाऱ्या विरोधी नागरीकांना आणि युवकांना आम्हाला सांगायचे आहे की,
जे पी गावीत यांनी हाती घेतलेल्या प्रश्नाबाबद तूम्ही तुमच्या आमदारांना सांगा आणि हा प्रदीर्घ काळ सूरू असलेला प्रश्न एकदाचा सोडवून टाका..
किंवा तुमच्या आमदारांना सांगा हे एकदाचे मीटवा म्हणजे जे पी गावीतांचा विषय संपेल...
आता तर विजयकुमार गावित, आदिवासी मंत्री आहेत नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष आहेत आणि इतर २५ आमदार आहेत आणि सत्ताधारी तुम्हीच आहेत.....मग एकदाचा हा प्रश्र्न मिटवून टाका आणि जे पी गावीत यांना मोकळे करा... म्हणजे तुमचे राजकारण मोकळे...
पण नाही.... तूम्ही आणि तुमचे पुढारी .....
आदिवासींची फक्त मते मागणार…..
वेळ आल्यावर आमिष दाखवनार, आश्र्वासन देणारं, योजना सांगणार, हजारों कोटी निधी सांगणार, पैसा, कपडे,वस्तू , साड्या वाटणार, बोकड्या मटण देणार, रस्त्याच्या दोन्हीं बाजूला आलटून पालटून उद्घाटने करणार…
आणि फसवून आमदार होणार….खासदार होणार….मंत्री होणार….अध्यक्ष होणार…. आदिवासींचे फॉरेस्ट प्लॉट, आदिवासींचे हक्काचे फॉरेस्ट प्लॉट गेले खडड्यात…
ही तर यांची खरी नितीमत्ता…..
आणि खरा चेहरा….
कॉ. जे पी गावीत..... काय करणार....
१० एकर जमीन मिळवून देणार…..
१० एकर जमिनीची किंमत विरोधकांनो तुम्हीच काढा…..
नाहीतर …हतगड ठाणापाडा, अशा गावाला जाऊन विचारा एकरचा भाव किती ?
आदिवासींची जमीन आदिवासींना मिळवून देणारच ही ठाम भुमिका…..
जमीन विकत मिळत नाहीं, मिळेल तरी आमचा आदिवासी विकत घेऊ शकत नाही
म्हणूनच येणाऱ्या पिढीला, ती शिदोरी मिळावी, बाप लढला पण मुलांसाठी ती सातबाऱ्यावर यावी महणून जे पी गावीत फॉरेस्ट प्लॉट धारकाला जमीन मिळावी म्हनून लढा देत आहेत …
जे पी विरोधकांच्या राजकरणात खरोखर दम असेल तर…. हा प्रश्न एकदाचा मिटवा, त्यांना हक्काचा फॉरेस्ट प्लॉट द्या…आमचा हा आदिवासी तूम्ही सांगाल तिकडे , तुम्हीं सांगाल तेथे मतदान करेल… आणि मग आमदार खासदार मंत्री अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हीच बना…. अगदी कायमचे तुम्हीच….
पण .....
आमच्या हक्कांची १० एकर जमीन तुमचे शासन देत नाहीं, देणारं नाही,सातबारा स्वतंत्र करुण देत नाही, तोपर्यंत जे पी गावीत, त्यांचे लढाऊ कार्यकर्ते , पदाधिकारी, फॉरेस्ट प्लॉट धारक माता बहिणी त्यांची तरुण मुले आणि युवा शक्ती कदापी शांत बसणार नाहीं ….
जो गोर गरीब आदिवासी बांधवांसाठी, फॉरेस्ट प्लॉट मिळवुन देतो,लढा देतो , शासनाशी भांडतो, त्याच्याच पाठीशी राहणार आणि मतदानही करनार….
फॉरेस्ट प्लॉटला विरोध करणाऱ्यांना दारात उभे करणार नाही, आणि त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही…
शासन आमच्या हक्काचा फॉरेस्ट प्लॉट देत नाही तोपर्यंत शासनाच्या दारात मोर्चा आणून आमच्या हक्काचे आम्हीं घेणारच…..
आजवर सुरगाणा तालुक्यात १७ हजाराच्या जवळपास, कळवण तालुक्यात चार हजारांच्या जवळपास आदिवासी बांधवांना फॉरेस्ट प्लॉट चा ताबा मिळाला असून अत्यंत कमी क्षेत्राचे प्रमाणपत्र मिळालेले हजारों आदिवासी बांधव आपल्या ताब्यातील १० एकर जमिनीसाठी जीवघेण्या नालायक शासनाशी संघर्ष करीत आहे.
त्यामुळें गेल्या चाळीस वर्षात जेवढ्या लोकांना जमिनी मिळाल्या आहेत त्यांची किंमत विरोधकांनी काढा
त्याचा मग हिशोब करा…. आयुष्याची शिदोरी म्हनून जमिनीचे भविष्यातील महत्व जाणून घ्या, कागदावरच निधी फायद्याचा की, जे पी गावीत यांनी दिलेला १० एकरचा फॉरेस्ट प्लॉट महत्वाचा….. हा विचार एका आदिवासीं बांधवांच्या नजरेतून केला तर जे पी गावीत यांचे कार्य दिसेल अन्यथा….
विरोधाला विरोध ही एकच मानसिकता तुमच्यात शिल्लक राहिल……
…….. मित्रांना आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न घेऊन जे पी गावीत लढत आहेत म्हणूनच हे एकच कार्य आज तुमच्यासमोर ठेवले आहे……
अजुन दुसरी कामे पाहिजे असतील तर तीही तुमच्यासाठी नक्कीच देणारं…..
पण……….
तूम्ही सर्व विरोधकांनी १९७८ पासुन ज्या आमदार, खासदार, मंत्रीपद उपभोगलेल्या तुमच्या नेत्यांची कारकिर्दीतील तुमच्या नजरेत भरनारी कामे दाखवा…..
नक्कीच…. दूध का दूध…
पाणी का पाणी…..
अशी माहिती ही गणेशनगर , खोबळा येथील जुन्या कार्यकर्त्यांनी दिली आहे . ही सर्व माहिती घेत असतांना अंगावर काटे आले .. एवढा संघर्ष हा आज पर्यन्त कोणत्याच नेत्याने केलेला नाही . तर मा. आमदार जिवा पांडू गावित यांच्या कार्याला सलाम.. आणि पुढे सुद्धा जनतेसाठी काम करत राहतील व जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी आहे . असे दिसून येते ..