लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार वसूल .. ! आताची मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana Recovery : लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिला यांना त्यांच्या बँक खात्या मध्ये मिळाले आहेत . तर हे पैसे आता काही महिला यांच्या कडून रीकवर म्हणजे वसूल होण्याची शकता आहे . तर सविस्तर माहिती काय आहे ? पैसे कुणाला परत करावे लागणार याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .

लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज हे https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या पोर्टल वरती सर्व महिला यांनी भरून घेतले होते . त्याचे लाभ हे महिला यांना रु. ७५०० हे त्यांच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात आले आहेत .

पैसे कुणाचे वसूल होणार

लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात आली आहे . यामध्ये ज्यांना आधी रु. १५०० किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम लाडकी बहीण योजने अंतर्गत जर मिळत असेल तर त्यांना या योजनेत अर्ज करण्याची परवानगी ही नव्हती .

तरी सुद्धा काही महिला यांनी बनावट अर्ज हा सादर करून या योजनेचा लाभ घेतला आहे . त्यामुळे त्याची पडताळणी म्हणून वेबसाइट वरती आता हालचाली ह्या सुरू झाल्या आहेत .

लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइट वरती खालील प्रमाणे २ नवीन ऑप्शन हे तुम्हाला मिळणार आहेत .

Sanjay Gandhi / Action या प्रमाणे २ नवीन ऑप्शन हे उपलब्ध झाले आहेत . यामध्ये ज्या महिला ह्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ घेत आहेत त्यांच्या समोर yes असा मेसेज हा उपलब्ध झाला आहे . ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांच्या नाव समोर No असे दिसत आहे .

ज्या महिलांच्या नावा समोर Yes असा ऑप्शन आला असेल त्या कुठल्या ना कुठल्या तरी सरकारी योजनांचा लाभ घेत असतील . तर त्याची पडताळणी होण्याची शक्यता आहे . व अर्ज हा योजनेत बसत नसेल तर पैसे वसूल होण्याची शक्यता आहे .

पैसे कोणत्या बँक मध्ये पडले याची माहिती अशी तपासा

वेबसाइट वरती दूसरा पर्याय एक उत्तम उपलब्ध करून देण्यात आला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये गेले . याची माहिती ही येथे पाहता येणार आहे . खालील प्रमाणे तुम्हाला माहिती ही दिसणार आहे .

वरील प्रमाणे तुम्ही तुमचे पैसे कोणत्या बँक खात्या मध्ये गेले व कधी आले . याची सविस्तर माहिती येथे पाहू शकणार आहात . तर मित्रांनो अश्या प्रकारे ही महत्वाची अपडेट आहे .

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *