Rabbi Pik Vima Online Arj Maharashtra : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण रब्बी पीक विमा ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . गहू या पिकाचा विमा आपण स्वतः कसं भरायचा तेही फक्त 1 रु. मध्ये याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .
महाराष्ट्र सरकार व भारत सरकार हे आपल्या देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते . यामध्ये pmfb प्रधानमंत्री पीक विमा योजना ही महत्वाची योजना आहे . या योजणेमुळे शेतकरी यांच्या पिकांना विमा हा मिळत असतो .
गहू पीक विमा 2024-25 माहिती
जर तुम्ही या रब्बी हंगाम मध्ये गहू या पिकांची शेती केली असेल तर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजने मार्फत फक्त १ रुपया मध्ये तुमच्या पिकांचा विमा हा काढू शकणार आहात . या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला खाली उपलब्ध करून दिली आहे .
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पीक विमा योजना |
पिकाचे नाव | गहू |
राज्य | महाराष्ट्र |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक | १५ डिसेंबर २०२४ |
प्रती हेक्टर विमा संरक्षण | 40000 रुपये |
गहू पीक विमा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
गहू या पिकाचा विमा भरण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज ही भासणार आहे .
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- पीक पेरा
- बँक पासबूक
वरील कागदपत्रे तुम्हाला गहू या पिकांचा विमा भरण्यासाठी लागणार आहेत . तर तुम्ही पीक विमा भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला खालील प्रमाणे ऑनलाइन अर्ज हा करायचा आहे .
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
रब्बी हंगाम गहू या पिकाचा विमा भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज हा https://pmfby.gov.in/ या पोर्टल वरती भरायचा आहे . त्या साठी खालील प्रमाणे अर्ज करा .
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्रावर जायचे आहे . तेथे खालील प्रमाणे तुम्ही अर्ज हे करू शकणार आहात .
- https://pmfby.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळावर या .
- त्या पुढे तुम्ही csc लॉगिन करून घ्या .
- तुम्हाला pmfby हा ऑप्शन निवडून रब्बी हंगाम २०२४ सिलेक्ट करायचे आहे .
- त्या पुढे अर्ज करायला सुरवात ही करायची आहे .
- सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करा
तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमद्धे ऑनलाइन अर्ज हे करू शकणार आहात . या योजनेच्या अधिक माहिती साठी तुम्ही कृषि ऑफिस मध्ये माहिती मिळवू शकता .